महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पुण्याच्या सिरमने 'या' कंपनीत घेतला 50 टक्के हिस्सा - Kairus Dadachanji

सिरम इन्स्टिट्यूटने स्कॉट काइशाची सहमालकी असलेल्या कायरस दादाचनजी आणि शपूर मिस्त्री यांच्याकडून कंपनीचा हिस्सा घेतला आहे. ही माहिती स्कॉट आणि सिरमने संयुक्तपणे दिली आहे.

अदार पुनावाला
अदार पुनावाला

By

Published : Aug 17, 2021, 8:10 PM IST

नवी दिल्ली- पुण्याची लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटने भारताला औषधी कंपन्यांचे हब होण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सिरमने स्कॉट काइशा या औषध पॅकिंजिंग कंपनीमध्ये 50 टक्के हिस्सा घेतला आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने स्कॉट काइशाची सहमालकी असलेल्या कायरस दादाचनजी आणि शपूर मिस्त्री यांच्याकडून कंपनीचा हिस्सा घेतला आहे. ही माहिती स्कॉट आणि सिरमने संयुक्तपणे दिली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचे पत्र

हेही वाचा-अहो आश्चर्य... म्हशीनं घेतला जीव, गळ्याला शेपूट आवळल्याने एकाचा मृत्यू

दोन्ही कंपन्या औषधी कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये संयुक्तपणे काम करणार

स्कॉट काइशाचा हिस्सा घेण्यामागे औषधी पॅकेजिंग सुरक्षितपणे करणे उद्देश आहे. मात्र, दोन्ही कंपन्यांनी अद्याप आर्थिक माहिती जाहीर केलेली नाही. दोन्ही कंपन्या औषधी कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये संयुक्तपणे काम करणार आहे. यामध्ये औषधांचे डोस, सिरींज, कार्टिज आदींचा समावेश आहे.

हेही वाचा-श्रीनगर: मोहरम मिरवणुकीचे वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुरवठा साखळीची सुरक्षा करणे हे रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे

सिरमचे सीईओ अदार पुनावला म्हणाले, की चांगले औषध हे योग्य पॅकेजिंगशिवाय रुग्णापर्यंत पोहोचू शकत नाही. पुरवठा साखळीची सुरक्षा करणे हे रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी स्कॉट हा उत्तम भागीदार आहे. कारण, त्यांच्याकडे उत्कृष्टता आणि जागतिक नेटवर्क आहे.

हेही वाचा-अफगाणिस्तानात भारताने केली आहे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आता तालिबानी मांडताहेत उच्छाद

औषधी कंपनी आणि पॅकेजिंग उद्योगांमधील नवीन सहकार्याचे हे उत्कृष्ट उदाहरण

स्कॉट काइशाचे सीईओ फ्रँक हेईनरीश्ट म्हणाले, की भारत हा जागतिक औषधींचे हब होण्यासाठी प्रस्थापित होत आहे. भारताच्या औषधी पुरवठा साखळीत आमचा अधिक ठसा उमटविताना आम्हाला आनंद होत आहे. दीर्घकाळापासून सिरम इन्स्टिट्यूट आमची ग्राहक आहे. त्यांच्याबरोबर आणखी जवळून काम करणे हे जागतिक आरोग्याच्या हितासाठी सर्वाधिक चांगले असणार आहे.औषधी कंपनी आणि पॅकेजिंग उद्योगांमधील नवीन सहकार्याचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचेही स्कॉट काइशाचे सीओ म्हणाले.

लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार

नुकतेच अदार पुनावाला म्हणाले, की सरकार आम्हाला प्रयत्न करत आहे. आम्हाला कोणतीही आर्थिक अडचण नाही. सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभारी आहोत. लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार आहे. हे डीजीसीआयच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले. हा डोस दोन वेळेचा असणार आहे. त्याची किंमत लाँचिंगवेळी निश्चित केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details