पुणे-देशात कोरोना लसीकरण मोहिम कासवगतीने सुरू असताना आणखी चिंताजनक वाढविणारी माहिती समोर येत आहे. संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्याची तीन वर्षे लागणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून लसीकरण मोहिमेविषयी मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकसंख्येबाबत जगात आपल्या देशाचा दुसरा क्रमांक आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात लसीकरण मोहिम दोन-तीन महिन्यांत शक्य नाही. त्यामध्ये अनेक मुद्दे आणि आव्हानांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण होण्याची तीन वर्षे लागणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराने ओलांडला पुन्हा ५०,००० चा टप्पा!
लसीकरण मोहिमेला सर्व पद्धतीने मदत करण्यासाटी कटिबद्ध राहणार
कोरोना महामारीत देशात लशींचा साठा अपुरा असताना टीकेची झोड होत असताना सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी खुलासा केला आहे. सीरमकडून देशाला प्राधान्य दिले जात असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. याबाबत स्पष्टीकरण करणारे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की लोकांची किंमत चुकवून आम्ही लस कधीही निर्यात केली नाही, याचा आम्हाला पुनरुच्चार करायला आवडेल. तसेच देशातील लसीकरण मोहिमेला सर्व पद्धतीने मदत करण्यासाटी कटिबद्ध राहणार आहोत.