महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सेबीचा कंपन्यांना मोठा दिलासा; 'हा' घेतला निर्णय - कंपनी व्यवहार

कोरोना महामारीमुळे लोकांना फिरण्यावर निर्बंध आले आहेत. त्याचा कंपन्यांच्या व्यवसायावर आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ही स्थिती लक्षात घेवून सेबीने कंपन्यांसाठी मुदत वाढवून दिली आहे.

Sebi
सेबी

By

Published : Mar 19, 2020, 4:33 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कामकाजावर परिणाम होत आहे. अशा स्थितीत बाजार नियंत्रक सेबीने कंपन्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतील वित्तीय परिणाम जाहीर करण्यासाठी सेबीने ४५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.

सेबीने कंपन्यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी शिथील करून दिला आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना फिरण्यावर निर्बंध आले आहेत. त्याचा कंपन्यांच्या व्यवसायावर आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सेबीने कंपन्यांसाठी मुदत वाढवून दिली आहे. कोरोनामुळे कंपन्यांना नियमांचे पालन करण्यासाठी तात्पुरता दिलासा देण्याची गरज असल्याचेही सेबीने म्हटले आहे.

हेही वाचा-केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क पुन्हा वाढविण्याची शक्यता

दरम्यान, कोरोनाचे महाराष्ट्रात ४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात कोरोनाचे १७२ रुग्ण आढळले आहेत. मुंबई, पुण्यासह इतर महानगरांमधील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details