नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ वाहनांची विक्रीसाठी ३१ मार्चनंतर १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचे लॉक डाऊन घोषित केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि दीपक मिश्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ वाहनांची विक्री करण्यासाठी १० एप्रिलनंतर मुदतवाढ दिली आहे. अशा वाहनांची दिल्लीत १ एप्रिल २०२० नंतर विक्री करण्यात येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) बीएस-४ वाहनांच्या विक्रीत मुदतवाढ करण्याची मागणी केली होती.