महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सर्वोच्च न्यायालयाकडून रतन टाटांविरोधातील बदनामीची याचिका तहकूब - उद्योगपती नस्ली वाडिया

दोन्ही पक्षांनी आपआपसात  तोडगा काढावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांनी सूचवले आहे.

Ratan Tata
रतन टाटा

By

Published : Jan 6, 2020, 2:05 PM IST

नवी दिल्ली - उद्योगपती नस्ली वाडिया यांनी रतन टाटा आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळाविरोधात दाखल केलेली फौजदारी बदनामीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने तहकूब केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी १३ जानेवारीला घेण्यात येणार आहे.


दोन्ही पक्षांनी आपआपसात तोडगा काढावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांनी सूचवले आहे. वाडिया यांची बदनामी करण्याचा हेतू नव्हता, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नोंदीचाही सरन्यायाधीश बोबडे यांनी उल्लेख केला.

हेही वाचा-टाटा सन्सचे चेअरमन पद स्वीकारण्याला इच्छुक नाही, पण...


काय आहे बदनामीचे प्रकरण?
गतवर्षी नस्ली वाडिया यांनी रतन टाटा आणि टाटा सन्स संचालक मंडळाचे इतर सदस्य यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला होता. यावर रतन टाटा आणि इतर संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयातील बदनामीचा खटला रद्द केला होता. टाटा आणि इतरांनी सायरस मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर २०१६ ला चेअरमन पदावरून काढताना बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा दावा वाडिया यांनी सत्र न्यायालयात केला होता.

हेही वाचा-कंपनी निबंधक कार्यालयाला एनसीएलएटीचा धक्का; फेटाळली 'ही' याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details