चेन्नई - दिवाळी सणानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स या सरकारी बँका त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देणार आहेत. या बँका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयाची मिठाई, सुकामेवा अथवा चॉकलेट देणार आहेत.
एसबीआय आणि ओबीसीची वित्तीय कामगिरी सुधारली आहे. त्यामुळे दोन्ही बँकांच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेची वित्तीय कामगिरी सुधारेल, असा विश्वास ओबीसीचे महाव्यवस्थापक (मनुष्य संसाधन विकास) कुमार सहा यांनी व्यक्त केला. ओबीसीने गतवर्षीच्या तुलनेत २३.५३ टक्क्यांचा अधिक नफा नोंदविला आहे. ही नफ्याची १२६ कोटी रुपये आहे.