महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्टेट बँकेकडून कोरोना रुग्णांकरिता 'कवच वैयक्तिक कर्ज योजना' - Kavach Personal Loan

विना तारण वैयक्तिक कर्ज योजनेत हे सर्वात कमी व्याजदराने कर्ज मिळताच स्टेट बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेचे चेअरमन दिशने खेरा म्हणाले, की रणनीतीच्या कर्ज योजनेतून कठीण काळात आर्थिक मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया

By

Published : Jun 11, 2021, 9:45 PM IST

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना रुग्णांकरिता 'कवच वैयक्तिक कर्ज योजना' जाहीर केली आहे. या कर्ज योजनेत ग्राहकाला अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांकरिता कोरोना उपचारासाठी कर्ज दिले जाणार आहे.

कवच वैयक्तिक कर्ज योजनेत ग्राहकाला वार्षिक व्याजदर ८.५ टक्क्यांनी ५ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. हे कर्ज फेडण्याची ६० महिन्यांची मुदत आहे.

हेही वाचा-...म्हणून कोव्हॅक्सिनला अमेरिकेकडून नाही मिळाली मंजुरी

सर्वात स्वस्त व्याजदराने विना तारण वैयक्तिक कर्ज

विना तारण वैयक्तिक कर्ज योजनेत हे सर्वात कमी व्याजदराने कर्ज मिळताच स्टेट बँकेने म्हटले आहे. स्टेट बँकेचे चेअरमन दिशने खेरा म्हणाले, की रणनीतीच्या कर्ज योजनेतून कठीण काळात आर्थिक मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्याचे आमचे सातत्याने प्रयत्न आहे. ज्यांना दुर्दैवाने कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे, त्यांना लाभ मिळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-विदेशी गंगाजळीने पहिल्यांदाच ओलांडला 600 अब्ज डॉलरचा टप्पा!

संकटाच्या काळात कोरोनावरील उपचार आणि इतर वैयक्तिक खर्चासाठी मदत करण्याकरिता एसबीआय बांधील असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

कॅनरा बँकही देत आहे कोरोनावरील उपचाराकरिता कर्ज

कॅनरा सुरक्षा वैयक्तिक कर्ज योजनेतून बँकेच्या ग्राहकांना २५ हजार ते ५ लाखांपर्यंतचे तातडीचे कर्ज कोरोनावरील उपचारासाठी देण्यात येणार आहे. या कर्जाची मुदत सहा महिन्यांची आहे. तर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कर्ज खिडकी योजना सुरू राहणार असल्याचे कॅनरा बँकेने म्हटले आहे. बँकेच्या ग्राहकांना ही कर्ज योजना रुग्णालयात दाखल होताना किंवा डिस्चार्ज झाल्यानंतरच घेता येणार आहे. या कर्जावरील प्रक्रिया शुल्क बँकेने रद्द केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details