नवी दिल्ली- तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने पैसे पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएसचे शुल्क माफ केले आहे. डिजीटल भारताला प्रोत्साहन देणारा मोठा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला आहे.
एसबीआय खात्यावरून पैसे पाठविणे झाले मोफत, ग्राहकांकरिता एनईएफटीसह आरटीजीएसचे शुल्क माफ - Digital India
रोकडविरहित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी एसबीआयने , आरटीजीएस आणि आयएमपीएसचे शुल्क माफ केले आहे.
प्रतिकात्मक
रोकडविरहित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी एसबीआयने , आरटीजीएस आणि आयएमपीएसचे शुल्क माफ केले आहे. मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिग आणि योनो अॅपचा करणाऱ्या ग्राहकांकरिता आयएमपीएसचे शुल्क १ ऑगस्ट २०१९ पासून माफ करण्यात येणार आहे. नुकतेच बँकेने एनईएफटी आणि आरटीजीएसचे शुल्क कमी केले होते. एसबीआय ही योनो अॅप आणि इंटरनेट बँकिंगला प्रोत्साहन देणार आहे.