नवी दिल्ली- क्रेडिट कार्डच्या बाजारपेठेवरील अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची शक्यता आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया लवकरच रुपे क्रेडिट कार्ड सुरू करणार आहे. या कार्डेमुळे देशातील देयक नेटवर्क यंत्रणेला वेग मिळण्याची शक्यता आहे.
रुपे क्रेडिट कार्ड लाँच करण्यासाठी शेवटचा करार हा एनपीसीआयपातळीवर करण्यात आला आहे. लवकरच आम्ही त्यासंदर्भात उत्पादने लाँच करणार आहोत, असे सीबीआय कार्डचे एमडी आणि हरदयाल प्रसाद यांनी सांगितले. रुपे क्रेडिट कार्ड हे खूप लोकप्रिय होईल. तसेच देशात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. त्याबाबत कोणतीही शंका नाही, असेही ते म्हणाले.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलेल्या देशात कार्डपैकी एक तृतियांश कार्ड हे रुपे कार्ड आहेत. काही राष्ट्रवादी लोक आहेत, त्यांच्याकडून केवळ रुपे कार्डची मागणी करण्यात येते. विदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी व्हिसा, मास्टरकार्डसह रुपे कार्ड लाँच करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.