बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- ग्राहकांनी ३० जूनपर्यंत आधार क्रमांक हा पॅन क्रमांकला संलग्न करण्याची सूचना केली आहे. जर ग्राहकांनी आधार क्रमांक हा पॅनशी संलग्न केला नाही तर मिळणाऱ्या सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.
ग्राहकांनी गैरसोय टाळण्याकरिता पॅन क्रमांक हा आधारशी संलग्न करावा, असा सल्ला असल्याचे स्टेट बँकेने ट्विटमध्ये म्हटले आहे. हे बँकेच्या सेवा सुरळित होण्यासाठी आवश्यक असल्याचेही स्टेट बँकेने म्हटले आहे. पॅन हा आधारला संलग्न करणे बंधनकारक असल्याकडे स्टेट बँकेने लक्ष वेधले आहे.
हेही वाचा-नोटाबंदीच्या काळातील व्हिडिओ रेकॉर्ड नष्ट करू नका, आरबीआयचे बँकांना आदेश.