मुंबई- सौदी अरेबियाची पब्लिक इन्वेस्टमेंट फंड (पीआयएफ) 11 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओने आज केली आहे. या गुंतवणुकीत पीआयएफ जिओचे 4.91 लाख कोटी किंमतीचे शेअर घेणार आहे.
पीआयएफ जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सा घेणार आहे. या गुंतवणुकीनंतर जिओमध्ये जगभरातील विविध कंपन्यांनी एकूण गुंतवणूक 1,15,693.95 कोटी रुपये होणार आहे
यापूर्वी जिओमध्ये फेसबुक, सिल्वर लेक, विस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआर मुबादाल,एआयडीआय, टीपीजी आणि एल कॅटर्टन या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे