नवी दिल्ली -देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशातच सहारा ग्रुपचे चेअरमन सुब्रता रॉय यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सहारा ग्रुपचे चेअरमन सुब्रता रॉय म्हणाले की, सुरक्षित राहणे आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांची काळजी घेणे, याकडे आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. सहारा कंपनीच्या माहितीनुसार सहारा इंडिया परिवारचे चेअरमन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा-'कोरोना लसीकरण सर्वांसाठी' व्हॉट्सअपचे नवीन स्टिकर पॅक लाँच
देशात कोरोनाचा उद्रेक-
शुक्रवारच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात 1 लाख 31 हजार 968 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आजतागायत 1,30,60,542 जणांना कोरोनाचा देशात संसर्ग झाला आहे. तर एका दिवसात 780 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने देशात आजवर एकूण 1 लाख 67,642 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी देशात आढलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही आजपर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक संख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
हेही वाचा-फेसबुकनंतर लिंक्डइनकडून ५० कोटी जणांचा डाटा लिक