नवी दिल्ली- सहाराने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सेबीने सहाराकडे ६२ हजार कोटी रुपयांचे ठेव रक्कम मागितली आहे. ही मागणी म्हणजे न्यायालयाचा अवमान आणि लोकांमध्ये सहाराविरोधात संताप होण्याचे कारण असल्याचे सहाराने म्हटले आहे.
सहारा इंडिया परिवारने सर्वोच्च न्यायालयात सेबीविरोधात न्यायलयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या सेबीच्या अधिकाऱ्यांना दंड करा, अशी सहाराने याचिकेतून सर्वाच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाकडून १.४० लाख कोटींचा ५९.६८ लाख कोटी करदात्यांना परतावा
सेबीने सहाराकडे ६२ हजार कोटी रुपयांची ठेव रक्कम मागितली होती. ही मागणी पूर्णपणे चुकीचे असल्याचा सेबीने दावा केला आहे. सेबीने सर्वाच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचेही सहाराने याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी २०१७ आदेशात केवळ मुद्दल रकमेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, सेबीने त्यामध्ये व्याजाच्या रकमेचाही समावेश केला आहे. सेबीने स्वत:चे हित तयार केल्याचे दिसत असल्याचा सहाराने दावा केला आहे. सहाराने केवळ १ हजार ५२९ कोटी रुपयांची ठेव देण्याची गरज आहे. प्रत्यक्षात सेबीकडून ६२ हजार कोटींची मागणी होते, असे सहाराने याचिकेत म्हटले आहे. सेबीने गेल्या आठ वर्षात गुंतवणूकदारांना दावे करण्यासाठी देशातील १५२ वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. त्यावर देशभरातून रकम परत घेण्यासाठी १९ हजार ५३२ दावे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा-सीमारेषेवर तणाव असतानाही चीन भारताकडून खरेदी करणार ५ हजार टन तांदूळ; दोन वर्षानंतर होणार आयात