महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जयपूरच्या राजमहालात प्रवाशांनाही करता येणार मुक्काम ; भाडे ऐकून वाटेल आश्चर्य

महालामधील गुडिलिया सुट हा २३ नोव्हेंबरपासून नोंदणीसाठी उपलब्ध असणार आहे. राजघराण्यातील असलेले सवाई पद्मनाभ सिंह यांनी महाल खासगी बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला आहे.  या पावलामुळे  राजकुमारी दिया कुमारी फाउंडेशनच्या (पीडीकेएफ) महिला सक्षमीकरणाच्या मदत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

जयपूर महाल

By

Published : Nov 11, 2019, 4:27 PM IST

जयपूर - राजस्थानची जयपूर ही राजधानी 'महालांचे शहर' म्हणून ओळखले जाते. या शहरामधील राजघराण्याने पहिल्यांदाच महाल खासगी नोंदणीसाठी (बुकिंग) खुला केला आहे. त्यामुळे एअरनब प्रवासी वेबसाईट अथवा अॅपवरून प्रवाशांना महालात राहण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

महालामधील गुडिलिया सुट हा २३ नोव्हेंबरपासून नोंदणीसाठी उपलब्ध असणार आहे. राजघराण्यातील असलेले सवाई पद्मनाभ सिंह यांनी महाल खासगी बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला आहे. या पावलामुळे राजकुमारी दिया कुमारी फाउंडेशनच्या (पीडीकेएफ) महिला सक्षमीकरणाच्या मदत मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-खासगी रेल्वे तेजस 'सुस्साट'; पहिल्याच महिन्यात ७० लाखांचा नफा

सवाई पद्मनाभ सिंह म्हणाले, पाहुण्यांना अलिशान गुडिलिया सूटमध्ये राहता येणार आहे. ही जागा महालामधील खासगी ठिकाणी आहे. ती जागा आम्ही पाहुणे आणि राजघराण्यामधील व्यक्तींसाठी वापरत होतो. त्यामध्ये स्वयंपाकघर, अलिशान स्नानगृह व जलतरण तलाव इत्यादींचा समावेश आहे. जगभरातील प्रवाशांना राजस्थानमधील जीवनाचा उत्साह अनुभवता येणार आहे. एअरनबसोबत जगभरात प्रवास केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-रिलायन्समध्ये गुंतवणूक केलेल्या अरॅम्कोचे 'आयपीओ प्रोस्पेक्टस लाँच'; भारतात करणार विस्तार

दरम्यान, सूटमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी प्रवाशांना 8 हजार डॉलर म्हणजे सुमारे ५ लाख ६० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details