महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रॉयल एनफिल्डने ग्राहकांकडून परत मागविल्या ७ हजार बुलेट - bike customers

ब्रेकसाठी वापरण्यात येणारे कॅलिपर बोल्ट हे रॉयल एनफिल्डच्या दर्जाप्रमाणे नाहीत. हे सेवेतील त्रुटी शोधणाऱ्यांना आढळून आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

रॉयल एनफिल्ड

By

Published : May 7, 2019, 4:04 PM IST

नवी दिल्ली - रॉयल एनफिल्डने बुलेट आणि बुलेट ईलेक्ट्राच्या ७ हजार दुचाकी परत मागविण्याची आज घोषणा केली आहे. ब्रेकसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅलिपर बोल्टमध्ये दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

बुलेटच्या दुरुस्तीसाठी (Servicing) पूर्वउपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कॅलिपर बोल्ट २० मार्च २०१९ ते ३० एप्रिल २०१९ दरम्यान करण्यात आल्याचे रॉयल एनफील्डने स्पष्ट केले आहे. ब्रेकसाठी वापरण्यात येणारे कॅलिपर बोल्ट हे रॉयल एनफिल्डच्या दर्जाप्रमाणे नाहीत. हे सेवेतील त्रुटी शोधणाऱ्यांना आढळून आल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्वत:हून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे २० मार्च २०१९ ते ३० एप्रिल २०१९ दरम्यान रॉयल एनफील्डची बुलेट खरेदी करणाऱ्यांना सर्व्हिससाठी कंपनीला द्यावी लागणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने ग्राहकांना तसेच संबंधितांना कळविल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details