महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वैयक्तिक माहिती कायद्यामुळे रिलायन्सच्या महसुलात सुमारे १०० कोटी डॉलरची वाढ होणार- मेर्रिल लिंच - Digital Ad

वैयक्तिक माहिती संरक्षणामुळे इंटरनेट कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या भारतामधील व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मेर्रिल लिंच

By

Published : Mar 27, 2019, 7:10 PM IST

नवी दिल्ली - देशातील वैयक्तिक माहिती संरक्षणाच्या नवे विधेयकामुळे (पीडीपी) रिलायन्स उद्योगसमुहाच्या उत्पन्नात 100 ते 250 कोटी डॉलरची भर पडणार आहे. अशी माहिती मेर्रील लिंचने अहवाला दिली आहे. मात्र पीडीपी विधेयकाचा फेसबुक, अॅमेझॉन, गुगल आणि वॉलमार्ट या कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होणार आहे.

वैयक्तिक माहिती संरक्षणामुळे इंटरनेट कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्यांच्या भारतामधील व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मार्गदर्शक सूचना स्पष्ट आहेत. रिलायन्स कंपनीला डिजिटल अॅडचा फायदा होईल, असे मेर्रील लिंचने म्हटले आहे . (सध्या रिलायन्सला डिजिटल अॅ़डपासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.) सध्या सोशल मीडियावर सुमारे २० ते ३० कोटी वापरकर्ते आहेत. हे प्रमाण जगाच्या १३ ते १४ टक्के एवढे आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकार सोशल मीडियाच्या वापरावर लक्ष ठेवत आहे.

अमेरिकेच्या इंटरनेट कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलवर परिणाम होणार आहे. या इंटरनेट कंपन्यांवर प्रत्यक्षात भौतिक नकारात्मक परिणाम (Material negative impact ) होणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details