हैदराबाद - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स किरकोळ विक्री आणि आणि ऑईल ते केमिकल या व्यवसायामधील घोषणांचा समावेश आहे
रिलायन्स इंडस्ट्रीज चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओमध्ये गुगल कंपनी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले...
- गुगल आणि जिओ या दोन्ही कंपन्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार असल्याची त्यांनी माहिती दिली. या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर 4जी आणि 5जी तंत्रज्ञान असलेल्या मोबाईलमध्ये होणार आहे. या भागीदारीतून भारत 2जी मुक्त होणार असल्याचे अंबानी यांनी यावेळी म्हटले.
- स्वदेशी 5जी तंत्रज्ञान विकसित केल्याची महत्त्वाची घोषणा मुकेश अंबानी या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
- मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश यांनी जिओ टीव्ही प्लस डेमो यावेळी दाखवला. त्याचा वापर ॲमेझॉन, हॉटस्टार अशा व्हिडीओ ॲप साठी करता येणार आहे
- ऑनलाईन वार्षिक सभेसाठी जिओ मीटचा वापर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात 50 लाख जिओ डाऊनलोड झाल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली
- स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी जिओ ग्लासचे लॉंचिंग करण्यात आले.
- जिओ मीटचा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कसा वापर होऊ शकतो, याची माहिती ईशा अंबानी यांनी यावेळी दिली.
- जिओ हेल्थ प्लेटफार्ममधून लोकांना ऑनलाइन कन्सल्टेशन करता येणार आहे. तसेच आरोग्य विषयाची माहिती ऑनलाइन संग्रहित करता येईल. असे ईशा यांनी सांगितले
- जिओ मार्ट हे देशातील विविध शहरांमध्ये सुरू झाले आहे. त्यामधून दररोज अडीच लाख ऑर्डर पुरविल्या जात असल्याची त्यांनी माहिती सांगितली.