नवी दिल्ली - फोर्टिस हेल्थकेअरचा माजी प्रवर्तक मालविंदर सिंग आणि रिलीग्री एन्टरप्रायजेसचा माजी सीएमडी सुनील गोधवानीला ईडीने अटक केली आहे. अटकेतील आरोपींवर रिलीगेअर फिनवेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून कंपनीचे सुमारे २ हजार ३९७ कोटींचे नुकसान झाले आहे.
सक्त अंमलबजावणी संचालनालयाने मालविंदर सिंग आणि सुनील गोधवानी यांना तिहार तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी रिलिगेअर फिनवेस्टमधील पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना महान्याय दंडाधिकाऱ्यापुढे हजर करण्यात येणार आहे. आरोपींची अधिक चौकशी करण्यासाठी ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रकरणाशी संबंधित वकिलाने सांगितले.
हेही वाचा-कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणे अव्यवहारी; शेतकऱ्यांसह आडतदारांमधून प्रतिक्रिया