नवी दिल्ली - रिलायन्स रिटेल कंपनी ही ऑनलाईन व्यवसाय सुरू करणार आहे. ही कंपनी व्यवसायात उतरल्यास अॅमेझॉन आणि वॉलमार्ट-फ्लिपकार्टसमोर मोठे आव्हान उभे निर्माण करण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती जागतिक बाजारपेठेचे संशोधन करणाऱ्या फॉरेस्टर संस्थेने अहवालातून दिली आहे.
ग्लोबल मार्केट रिसर्चचर फॉरेस्टरच्या माहितीनुसार रिलायन्स रिटेलचे ६ हजार ६०० हून अधिक शहरात १० हजार ४१५ स्टोअर आहेत. रिलायन्सकडून देण्यात येणाऱ्या मोठ्या सवलतीमुळे अॅमेझोन व फ्लिपकार्ट संकटात सापडेल, असा अंदाज फॉरेस्टरचे विश्लेषक सतिश मीना यांनी व्यक्त केला. ई-कॉमर्स धोरणातील नव्या नियमामुळे रिलायन्स रिटेलला फायदा होणार आहे. तसेच रिटेलच्या पायाभूत सेवांचा ग्राहकांना सेवा देण्यासाठी उपयोग करता येणार असल्याचे फॉरेस्टरच्या अहवालात म्हटले आहे.