महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्हॉट्सअ‌ॅपद्वारे जिओमार्टची वस्तू विक्री 'या' शहरांमध्ये झाली सुरू

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ३ कोटी किराणा दुकानांना जिओमार्टशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते. ही जिओमार्टची विक्री सेवा मुंबईच्या काही उपनगरांमध्ये सुरू झाली आहे.

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी

By

Published : Apr 26, 2020, 4:38 PM IST

मुंबई - फेसबुकबरोबर सुमारे ४४ हजार कोटींची भागीदारी केलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओमार्टमधून वस्तू विक्री सुरू केली आहे. ही विक्री सेवा नवी मुंबईमधील उपनगरे, ठाणे आणि कल्याणमध्ये सुरू केली आहे. ही ग्राहक सेवा लवकरच उर्वरित देशात सुरू होणार आहे.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ३ कोटी किराणा दुकानांना जिओमार्टशी जोडणार असल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा-ऑक्सफोर्ड विद्यापीठनिर्मित कोरोना लसीचे पुण्यात सुरू होणार उत्पादन

जिओमार्टची अशी घ्या सेवा-

  • जिओमार्टचा हा ८८५०० ०८०० हा व्हॉट्सअ‌ॅप क्रमांक अ‌ॅड करा.
  • त्यानंतर जिओ तुम्हाला ३० मिनिटे वैध असलेली चॅट विंडो असलेली लिंक तुम्हाला पाठवेल.
  • त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर पेजवर येणारी माहिती भरा. त्यामध्ये तुमचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक असणार आहे.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर जिओ उपलब्ध असलेल्या वस्तुंची यादी दर्शविणार आहे. त्यानंतर जवळील किराणा स्टोअर निवडून वस्तू ग्राहकांना मागविता येणार आहेत.

हेही वाचा-कोरोनाशी लढा : एटीएममधून रक्कम काढताना अशी काळजी घ्या!

अशी आहे रिलायन्सची व्हॉट्सअ‌ॅपबरोबर भागीदारी

फेसबुकने जिओमध्ये ९.९९ टक्के हिस्सा घेतला आहे. ही तंत्रज्ञान कंपनीमधील जगात सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. तर एफडीआयमधून (थेट विदेशी गुंतवणूक) ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओ, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‌ॅपने व्यवसायिक भागीदार करार केला आहे. यामधून व्हॉट्सअ‌ॅपचा वापर करून जिओमार्ट ही रिलायन्स रिटेलचा व्यवसाय वाढणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details