नवी दिल्ली - कोरोनाशी लढण्याकरता रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ५०० कोटींची मदत पीएम केअर्स फंडला देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच कंपनीने गरजूंना मोफत अन्न आणि आपत्कालीन वाहनांसाठी मोफत धान्य, कोरोनाकरिता देशातील पहिले रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरात सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रिलायन्स प्रत्येकी ५ कोटी रुपये देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, कोरोनाच्या संकटावर भारत लवकरत मात करेल, असा आम्हाला विश्वास आहे.