मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्स ही स्वच्छ उर्जा क्षेत्रात प्रवेश करत असल्याची घोषणा गुरुवारी केली आहे. ते ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत बोलत होते. नव्या उद्योगासाठी रिलायन्स ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी समभागधारकांशी बोलताना म्हणाले, की २०१६ मध्ये जिओने डिजीटल दरी दूर करणारा जिओचा सेतू अस्तित्वात आणला. २०२१ मध्ये कंपनी उर्जाच्या नव्या व्यवसायात प्रवेश करून हरित उर्जेतील दरी दूर करण्याचे उद्दिष्ट बाळगत आहे.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पच्या मोटारसायकलींसह स्कूटर १ जुलैपासून महागणार
गुजरातमध्ये उर्जा कंपन्यांचे करखाने
रिलायन्स नव्या उद्योगामध्ये सोलर फोटोवोल्टैक मोड्यूल फॅक्टरी, अॅडव्हान्सड एनर्जी स्टोरेज बॅटरी फॅक्टरी, इलेक्ट्रोलायझर फॅक्टरी आणि फ्यूईल सेल फॅक्टरी उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने गुजरातमधील जामनगरमध्ये धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा कॉम्पलेक्स बांधले आहे.
हेही वाचा-जगात सर्वात स्वस्त 4G Phone जिओफोन नेक्स्ट 10 सप्टेंबरला होणार लाँच
उर्जा कंपनीसाठी एकूण ७५ हजार कोटींची गुंतवणूक-
नव्या कंपनीसाठी रिलायन्सने ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर याव्यतिरिक्त कंपनी १५ हजार कोटी रुपयांची पुरवठा साखळी, भविष्यातील तंत्रज्ञान आदीसाठी गुंतवणूक करणार आहे. त्याचा परिणाम म्हणून रिलायन्सची नवीन उर्जा उद्योगामध्ये एकूण ७५ हजार कोटी रुपयांची तीन वर्षांमध्ये गुंतवणूक होणार आहे.