नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंग्लंडची बीपी कंपनी संयुक्त भागादारीतून देशात ५ हजार ५०० पेट्रोल पंप सुरू करणार आहे. तसेच विमान इंधनाची किरकोळ विक्रीही करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज व ब्रिटिश पेट्रोलियम देशात सुरू करणार ५ हजार ५०० पेट्रोल पंप
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंग्लंडची बीपी कंपनीने संयुक्त भागीदारीतून काम करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यामध्ये संपूर्ण देशभरात विमान इंधनाची विक्री आणि किरकोळ सेवा स्टेशनच्या नेटवर्कचा समावेश आहे
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंग्लंडची बीपी कंपनीने संयुक्त भागीदारीतून काम करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यामध्ये संपूर्ण देशभरात विमान इंधनाची विक्री आणि किरकोळ सेवा स्टेशनच्या नेटवर्कचा समावेश आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे १ हजार ४०० पेट्रोल पंप आहेत. तर ३० विमानतळावर विमान इंधन विक्रीचा व्यवसाय आहे. यांचाही संयुक्त भागीदारीमध्ये समावेश असणार आहे. संयुक्त भागीदारीमध्ये रिलायन्सचा व्यवसायामध्ये ५१ टक्के तर बीपीचा ४९ टक्के हिस्सा असणार आहे.
दोन्ही कंपन्यामधील करार २०१९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे संबंधित नियामक संस्थांच्या मंजुरीवर अवलंबून असणार आहे. तर पूर्ण व्यवहाराची प्रक्रिया ही २०२० मध्ये पहिल्या सहा महिन्यात पूर्ण होईल, असे दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे.