नवी दिल्ली - बाजारपेठेतील कंपन्यांच्या मक्तेदारीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारतीय स्पर्धा आयोगाबरोबर (सीसीआय) काम करण्याची गुगलने तयारी दर्शविली आहे. गुगलने अँड्राईड मोबाईल ऑपेरेटिंग सिस्टिमचा गैरवापर केल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुगलने आपली भूमिका मांडली आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाबरोबर काम करण्याची तयारी - गुगल - गुगल सर्च
सर्च दाखविताना मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला १३६.८६ कोटींचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात गुगलने राष्ट्रीय कंपनी लवाद प्राधिकरणाकडे दाद मागितली होती.
अँड्राईडमुळे लाखो भारतीय मोबाईलच्या सहाय्याने इंटरनेटद्वारे जोडले जातात. हे परवडणारे तंत्रज्ञान असल्याचे गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अँड्राईड हे अधिक स्पर्धात्मक आणि नव शोधाला उपयुक्त असल्याचे आम्ही सीसीआयला दाखवू शकतो, असे गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
यापूर्वी सीसीआयने गुगलला ठोठावला आहे दंड-
सर्च दाखविताना मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला १३६.८६ कोटींचा दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात गुगलने राष्ट्रीय कंपनी लवाद प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. फेब्रुवारीमध्ये मॅट्रीमोनी डॉट कॉम आणि कन्झ्युमर आणि ट्रस्ट सोसासयटी या संस्थेने गुगलच्या अनुचित व्यापार प्रकाराविरोधात सीसीआयकडे तक्रार केली होती. यावरील सुनावणीत सीसीआयने गुगलचा दोष असल्याचा ठपका ठेवत दंड ठोठावला होता. भारतामधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन सीसीआयने दंडाची रक्कम ठोठावली होती. बाजारपेठेत मक्तेदारीचा प्रयत्न केल्याने युरोपियन युनियननेही मार्चमध्ये गुगलला १७० कोटी डॉलरचा दंड ठोठावला होता.