मुंबई - दिल्लीमधील दंगलीच्या घटना आणि नागरिक सुधारणा कायदा विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. यावर बोलताना कोका-कोलाचे ग्लोबल चेअरमन यांनी समाजामधील मोर्चे आणि दंगलीने विविध व्यवसायांवर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. या वाढत्या संघर्षाला लोकशाही मार्गाने भारताने सोडविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कोका-कोलाचे ग्लोबल चेअरमन जेम्स क्विन्सी म्हणाले, भारत ही कोको-कोला कंपनीसाठी मोठी क्षमता असलेली बाजारपेठ आहे. याचे श्रेय भारताच्या लोकशाहीला आहे. भारत ही आकारमानात कंपनीसाठी पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येत्या पाच वर्षात कंपनीने दुप्पट विक्री करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे भारत कंपनीसाठी चौथी सर्वात मोठी बाजारपेठ होणार आहे. सध्याच्या दंगली आणि निषेध मोर्चांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, जर समाजाच्या कामात काही विस्कळितपणा असेल तर काही प्रमाणात त्याचा सर्व व्यवसांयावर परिणाम होतो.
हेही वाचा-कोरोनाचा परिणाम ; उत्पादन क्षेत्राची फेब्रुवारीत अंशत: घसरण