नवी दिल्ली - 'व्हेलेन्टाईन डे' हा प्रेम व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. या दिवसाचे निमित्त साधून दिल्ली विमानतळाने गमतीशीर ट्विट करत इंडिगोला प्रेमाचे वचन मागितले. त्यानंतर विमान कंपनी इंडिगो आणि एअर इंडियाने केलेल्या ट्विटने समाजमाध्यमात धमाल उडवून दिली.
दिल्ली विमानतळाने इंडिगो एअरलाईन्सला उद्देशून ट्विट केले. माझी धावपट्टी सोडून कुठेही धावणार नाही, असे वचन दे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
इंडिगोनेही त्याच प्रेमाच्या अर्थात विनोदी शैलीत ट्विटला उत्तर दिले आहे. ओह, डार्लिंग @दिल्लीएअरपोर्ट, तुझ्या प्रेमामुळे प्रत्येक वेळी मी वेळवर येतो. व्हॅलेटन्टाईन डेला असे प्रेमळ ट्विट होत असताना त्यात आणखी भर पडत गेली.
दिल्ली विमानतळाने इंडिगोला प्रतिक्रिया दिली, 'माय लव्ह, आपल्याकडे अनेक भविष्यात एकत्रित योजना आहेत. यावर इंडिगोनेही शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाचा उल्लेख केला.
मी तुझ्यासाठी वेडा आहे, असे दिल्ली विमानतळाने म्हटले आहे. दिल्ली विमानतळाने इंडिगोला प्रतिक्रिया देताना म्हटले, तुझे प्रेम अमर्यादित असल्याचे मला माहित आहे. या ट्विटनंतर दिल्ली विमानतळाने एअर इंडियालाही उद्देशून ट्विट केले.
पहिल्या विमान उड्डाणाला तू माझे प्रेम असणार आहे. एअर इंडियाने तुझ्या हबमध्ये खास जागा दिल्यामुळे खूप छान वाटत असल्याचे म्हटले आहे. दिल्ली विमानतळानेही एअर इंडियाला प्रतिक्रिया देत म्हटले, तू किती प्लेन आणि साधा आहे, यावर माझे प्रेम आहे.
व्हॅलेन्टाईन डेचे असे ट्विट पाहत अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एअरपोर्टने स्पाईसजेट, विस्तारा आदी कंपन्यांना उद्देशून ट्विट केले आहेत.