नवी दिल्ली - भारतीय औषधी उद्योगाकडून चीनमधील कोरोनाच्या संसर्गावर जवळून देखरेख ठेवण्यात येत आहे. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या चीनमधून निर्यात होत असते. त्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्व कंपन्यांकडून कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सरकार आणि औषधी उद्योग परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचे इंडियन फार्मा अलायन्सचे महासचिव सुदर्शन जैन यांनी सांगितले. औषधनिर्मितीला लागणारे महत्त्वाच्या एपीआयसाठी पर्यायी स्त्रोतांचा विचार केला जात असल्याचेही जैन यांनी सांगितले. नियामक संस्थांकडून परवानगी मिळाली तर पर्यायी स्त्रोत उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय राज्यांनी घेण्याची गरज