नवी दिल्ली - पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्सला जीवन विमा निगमने (एलआयसी) आर्थिक मदत केली आहे. एलआयसीने पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या रोख्यांची (एनसीडीएस) खरेदी केली.
पीएनबी हाऊसिंग फायनान्सला एलआयसीचा मदतीचा हात; २ हजार ५०० कोटींच्या रोख्यांची खरेदी - पंजाब नॅशनल हाऊसिंग फायनान्स
पीएनबीच्या हाऊसिंग फायनान्सच्या खासगी रोख्यांची १० वर्षांची मुदत आहे. त्याचा वापर कंपनी ही व्यावसायिक कामासाठी करणार आहे.

पीएनबीच्या हाऊसिंग फायनान्सच्या खासगी रोख्यांची १० वर्षांची मुदत आहे. त्याचा वापर कंपनी ही व्यावसायिक कामासाठी वापर करणार आहे. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा पीएनबी हाऊसिंग फायनान्सने एनसीडी रोख्यांची विक्री केली आहे. यापूर्वी कंपनीने विदेशातील बँकेला 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री केल्याचे पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. रोखे विक्रीमुळे कंपनीची स्थिती बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले.
पीएनबीच्या हाऊसिंग फायनान्स ही पंजाब नॅशनल बँकेची कंपनी आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सीने सुमारे १३ हजार कोटींची फसवणूक केल्याने पंजाब नॅशनल बँकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.