मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँक ही महिनाभरात सुरू होईल, असे मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने काँग्रेस नेते संजय निरुपम यांना आश्वासन दिले आहे. ही माहिती त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर ट्विट करून दिली आहे.
सेरफेसी(एसएआरएफएईएसआय) या कायद्यानुसार बँकांस वित्तीय संस्थांना थकित कर्ज वसूल करण्यासाठी रहिवासी अथवा व्यापारी मालमत्ता विकण्याचे अधिकार आहेत. या कायद्याचा संदर्भ देत संजय निरुपम यांनी एचडीआयएल कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव काही आठवड्यात होणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. चालू खात्यांचे व्यवहार लवकरच सुरू होणार असल्याचे आश्वासन आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख राज्यवर्धन यांनी दिल्याचे संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-ऐन दिवाळीत पीएमसी ठेवीदारांची आरबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने