नवी दिल्ली - एअर इंडियाने पैसे थकविल्याने कंपनीच्या वैमानिक संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. वैमानिकांना नोटीसशिवाय कंपनी सोडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय व्यवसायिक वैमानिक संघटनेने (आयसीपीए) केली आहे.
एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी विकण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. विमान कंपनीचे भविष्य अनिश्चित असताना वैमानिक काम करण्याच्या स्थितीत नसल्याचे वैमानिक संघटनेने म्हटले आहे. वैमानिक संघटनेत सुमारे ८०० वैमानिक आहेत. या संघटनेने केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग यांना पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत. बंद पडलेल्या इतर २१ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची इच्छा नाही. देशातील वाढणाऱ्या बेरोजगारीत भर घालायची नाही, असे संघटनेने २३ डिसेंबरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.