मुंबई- आर्थिक घोटाळ्यामुळे संकटात सापडलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची भेट घेवून पीएमसीचे पुनरुज्जीवन करण्याबाबत चर्चा केली.
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्याचे शरद पवारांनी ट्विट केले आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये?
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची दिल्लीत भेट घेतली. त्यामध्ये पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवनाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावर विधायक दृष्टीकोनातून विचारांची देवाण-घेवाण झाली.
हेही वाचा-'ओयो'कडून 1200 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर 'संक्रांत'
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पीएमसी बँकेवर गतवर्षी निर्बंध लागू केले आहेत. पीएमसीमध्ये सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांवरून अधिक घोटाळा झाला आहे. त्यामुळे आरबीआयने ठेवीदारांना खात्यामधून पैसे काढण्यावर निर्बंध लागू केले आहेत. आरबीआयने हळूहळू निर्बंध शिथील करत खातेदारांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम सहा महिन्यापर्यंत काढण्याची परवानगी दिली आहे. बँकेत पैसे अडकल्याने ठेवीदार संकटात सापडले आहेत.
हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत ७.३५ टक्के महागाईची नोंद; आरबीआयची ओलांडली मर्यादा