नवी दिल्ली- एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला ही भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत असतानाच देशातील इलेक्ट्रिक बाजारपेठेत आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे. ओलाने जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन केंद्राची घोषणा केली आहे. या ओला फ्युचर फॅक्टरीच्या उत्पादन केंद्रामधून वार्षिक १ कोटी वाहनांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे तामिळनाडूमधील उत्पादन केंद्र २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
ओलाच्या उत्पादन केंद्रामुळे थेट १० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. तर त्याचबरोबर ओलाचे पुरवठादार आणि विक्रेते यांना नोकऱ्या मिळणार आहेत. ओला फॅक्टरची सीईओ तथा चेअरमन भाविष अग्रवाल यांनी उत्पादन प्रकल्पाचा पहिला टप्पा जून अखेर सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'