नवी दिल्ली- ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्राहकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. 1 लाख ओला स्कूरटरचे 24 तासात बुकिंग करण्यात आले आहे. जगात पहिल्यांद स्कूटरच्या बुकिंगला एवढा प्रतिसाद मिळाला आहे.
ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक स्कूटरचे 15 जुलैपासून बुकिंग सुरू केले आहे. बुकिंगसाठी केवळ 499 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. ओलाचे चेअरमन आणि सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले, की आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाला भारतामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे खूप उत्साहित आहोत. अभूतपूर्व मागणीमुळे हे स्पष्ट आहे, की ग्राहक हे इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत.
हेही वाचा-ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल; आयसीएमआरचा इशारा
जगाला शाश्वत वाहतुकीत वळविण्याच्या आमच्या मोहिमेचे हे पहिले मोठे पाऊल आहे. ज्यांनी ओला स्कूटर बुक केली आहे, अशा सर्व ग्राहकांचे आभार मानतो. ते इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीत सहभागी झाले आहेत. ही फक्त सुरुवात असल्याचे ओला इलेक्ट्रिकचे सीईओ अग्रवाल यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट
ग्राहकांकडून इलेक्ट्रिक स्कूटरची अभूतपूर्व मागणी आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीचे अद्ययावत तंत्रज्ञान असलेली ओला स्कूटर असणार आहे. ओला स्कूटर ही भारतात उत्पादन होणार आहे. कंपनीच्या कारखान्याचे पहिल्या टप्प्यात उत्पादन होणार आहे. या कारखान्यातून दरवर्षी 1 कोटी वाहनांचे पुढील वर्षापासून उत्पादन करण्यात येणार आहे.
हेही वाचा-उत्तर प्रदेश: मणप्पुरम गोल्ड लोनमध्ये दरोडा: 17 किलो सोने लंपास
18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज-
कंपनीने अद्याप ई-स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. ओलाची ई-स्कूटर ही 18 मिनिटात 50 टक्के रिचार्ज होते. तर 75 किलोमीटर स्कूटर धावू शकते.
ओलाकडून 10 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या
ओला इलेक्ट्रिक कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत जुलैमध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी कंपनीकडून हायपरचार्जर नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. या नेटवर्कमध्ये देशातील 400 शहरांमध्ये 1 लाख चार्जिंग पॉईंट सुरू करण्यात येणार आहे. ओलाने तामिळनाडूमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या कारखान्यासाठी 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 10,000 नोकऱ्या तरुणांना मिळू शकणार आहेत. तर हा कारखाना जगातील सर्वात मोठा स्कूटरची निर्मिती करणारा कारखाना असणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कारखान्यामधून वार्षिक 20 लाख स्कूटरची निर्मिती होऊ शकणार आहे.