लंडन- भारतीय कंपनी ओलाने लंडनमध्ये आज अॅप लाँच केले आहे. या अॅपमध्ये २५ हजारांहून अधिक वाहन चालकांनी नोंदणी केली आहे.
बंगळुरुस्थित ओला कंपनी लंडनमधील प्रवाशांना सर्व प्रकारच्या वाहनांची सेवा देणार आहे. लंडनमध्ये व्यवसाय सुरू करणे हा मैलाचा दगड आहे. इंग्लंडमधील विविध शहरातील लोकांना जोडण्यासाठी आम्ही टाकलेले महत्त्वाकांक्षी पाऊल असल्याचे ओला इंटरनॅशनलचे सिमन स्मिथ यांनी म्हटले आहे. इंग्लंडमधील ओलाच्या प्रगतीची आम्हाला अभिमान आहे. लंडनमधील प्रवाशांना गुणवत्ता, सुरक्षितता आणि विश्वसनीयता देवून आम्ही यश मिळविणार आहोत.