नवी दिल्ली - ई-स्कूटरचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ओलाकडून विविध राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.
ओलाने विविध प्रकल्पांतून वार्षिक २० लाख ई-स्कूटरचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी १०० एकर जागेवर सौर उर्जा वापर करून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा ओला इलेक्ट्रिकचा प्रयत्न आहे. ओला इलेक्ट्रिकने १ हजार अभियंत्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले. तर लवकरच इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करणार असल्याचेही कंपनीने म्हटले होते. ओला इलेक्ट्रिकमध्ये टायगर ग्लोबल, मॅट्रिक्स इंडिया, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे.