मुंबई - बॉम्बे डायिंग चेअरमन नस्ली वाडिया यांनी टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा आणि इतरावंरील अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला आहे. वाडिया यांनी रतन टाटा आणि टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ३०० कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला भरला होता.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. बोबडे यांनी वाडिया यांचा अब्रुनुकसानीचा खटला काढून घेण्याची मान्यता दिली आहे. वाडिया यांचे अब्रुनुकसानी करण्याचा टाटा आणि इतरांचा उद्देश्य नव्हता, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षणात म्हटले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विधानाचा संदर्भ दिला. वाडिया यांच्यावतीने वरिष्ठ वकील सी. ए. सुंदरम यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. वाडिया यांनी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे कौतुक केले.