महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नोकिया प्रकल्पासह ह्युदांईतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; प्रकल्प केले बंद - ह्युदांई मोटार न्यूज

नोकिया प्रकल्पामधील ५६ कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी कांचीपुरममधील १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारी जिल्हा असलेल्या थिरुवल्लूर आणि छेंगालपट्टूमधील २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अ‌ॅपलला सुट्ट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या सॅलकॉम्प कॉर्पोरेशनने हा प्रकल्प गेल्या वर्षी नोकियाकडून ताब्यात घेतला होता.

ह्युदांई मोटार
ह्युदांई मोटार

By

Published : May 25, 2020, 9:05 PM IST

चेन्नई - टाळेबंदीनंतर सुरू झालेल्या नोकिया आणि ह्युदांई कंपनीला कोरोनाच्या संकटामुळे प्रकल्प बंद करावा लागला आहे. चेन्नईमधील श्रीपेदूंबर विशेष आर्थिक क्षेत्रातील नोकिया प्रकल्प तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आला आहे. या प्रकल्पामधील ४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नोकिया प्रकल्पामधील ५६ कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी कांचीपुरममधील १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर शेजारी जिल्हा असलेल्या थिरुवल्लूर आणि छेंगालपट्टूमधील २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अ‌ॅपलला सुट्ट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या सॅलकॉम्प कॉर्पोरेशनने हा प्रकल्प गेल्यावर्षी नोकियाकडून ताब्यात घेतला होता.

हेही वाचा-'मोठ्या उद्योगांसह सरकारकडे एमएसएमई उद्योगांचे ५ लाख कोटी रुपये थकित'

कोरोनाच्या चौथ्या टाळेबंदीत नियम शिथील केल्यानंतर हा प्रकल्प ८ मे रोजीपासून कार्यान्वित करण्यात आला होता. तामिळनाडू सरकारने चेन्नईच्याबाहेर असल्याने हा प्रकल्प सुरू करण्याची मंजुरी दिली होती. या कंपनीने ५० टक्के मनुष्यबळ कामावर ठेवून काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय शारिरीक अंतर, सॅनिटायझेशन अशा मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. मात्र, हे नियम पाळण्यात आले नसल्याचा कंपनीवर आरोप करण्यात येत आहे.

हेही वाचा-कोटक महिंद्रा बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात

इरुनगट्टूकोट्टाई येथील ह्युदांई मोटारमधील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीने तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. तरीही कंपनीचे काम सुरू राहणार असल्याचे ह्युंदाई कंपनीने म्हटले आहे. कोरोनाबाधित कर्मचारी वेगाने बरे होत आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. सरकारच्या नियमानुसार सर्व आरोग्याच्या सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचे ह्युंदाईने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details