महाराष्ट्र

maharashtra

जागल्यांच्या दाव्यांप्रमाणे प्रथमदर्शनी पुरावा आढळला नाही - इन्फोसिस

By

Published : Nov 4, 2019, 10:33 PM IST

जागल्यांनी केलेल्या तक्रारीबाबत नॅशनल स्टॉक एक्सचेंजने इन्फोसिकडून २४ ऑक्टोबरला स्पष्टीकरण मागविले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना इन्फोसिसने लेखापरीक्षण समितीने कायदे कंपनीबरोबर तपास केल्याचे म्हटले आहे.

संग्रहित -आरसीईपी

नवी दिल्ली - जागल्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे प्रथमदर्शनी पुरावे आढळून आले नसल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. काही जागल्यांनी (व्हिसलब्लोअर) इन्फोसिसमध्ये अनुचित प्रकार झाल्याची कंपनीच्या संचालक मंडळाकडे तक्रार केली होती.

जागल्यांनी केलेल्या तक्रारीबाबत नॅशनल स्टॉक एक्सचेंजने इन्फोसिसकडून २४ ऑक्टोबरला स्पष्टीकरण मागविले होते. याबाबत स्पष्टीकरण देताना इन्फोसिसने लेखापरीक्षण समितीने कायदे कंपनीबरोबर तपास केल्याचे म्हटले आहे. तसेच अंतर्गत स्वतंत्र लेखापरीक्षणासाठी अर्नेस्ट व यंगचा सल्ला घेण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'

जागल्यांनी काय म्हटले होते पत्रात-


इन्फोसिसमधील काही कर्मचारी यांनी जागल्यासारखे काम करत काही अनुचित प्रकार झाल्याचा आरोप पत्रातून केला. या पत्रात त्यांनी लेखापरीक्षक आणि संचालक मंडळाकडून महत्त्वाची माहिती दडविण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये व्हेरिझॉन, इंटेल आणि संयुक्त भागीदारीचे प्रकल्प आणि एबीएन अ‌ॅम्रो ताब्यात घेणे आदींचा समावेश आहे. हे लेखापरीक्षणाच्या मानकानुसार प्रमाणित नसल्याचेही एका इन्फोसिसच्या माजी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक तिमाहीत अनुचित प्रकार केल्याचा दावा काही अज्ञात इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी केला. याचे ई-मेल आणि ध्वनीमुद्रण असल्याचे कर्मचाऱ्यांनी पत्रातून म्हटले आहे.

इन्फोसिसचे चेअरमन नंदन निलकेणी यांनी पत्राबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details