महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

करमुक्त दुकानातील वस्तुंवर जीएसटी लावता येणार नाही - मुंबई उच्च न्यायालय

प्रवाशांनी बॅगेमध्ये नियमाप्रमाणे आणलेल्या वजनाच्या वस्तूवरही सीमा शुल्क अथवा आयजीएसटी लागू करता येणार नाही. ते प्रवासी सामान असल्याने जीएसटीमधून वगळण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

संग्रहित -मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Oct 11, 2019, 2:17 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या करमुक्त दुकानांमधील वस्तुंवर जीएसटी (वस्तू व सेवा कर) लावता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे देशभरातील करमुक्त दुकानांना (ड्यूटी फ्री शॉप्स) मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करमुक्त दुकाने ही सीमाशुल्क विभागाच्या हद्दीत आहेत. त्या दुकानीतल वस्तुंसाठी सीमा शुल्क माफ आहे. हे क्षेत्र ओलांडले नसताना त्या वस्तुंवर जीएसटी लावता येणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच करमुक्त दुकानातील वस्तुंवर सीमा शुल्क अथवा एकत्रित कर (आयजीएसटी) लावता येणार नाही.

प्रवाशांनी बॅगेमध्ये नियमाप्रमाणे आणलेल्या वजनाच्या वस्तूवरही सीमा शुल्क अथवा आयजीएसटी लागू करता येणार नाही. ते प्रवासी सामान असल्याने जीएसटी व सीमा शुल्कामधून वगळण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details