मुंबई- रिलायन्स फाउंडेशन्सचे चेअरमन नीता मुकेश अंबानी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'हर सर्कल' हा व्यापकस्तरावरील सोशल मीडिया लाँच केला आहे. त्यामध्ये महिलांसाठी डिजीटल कंटेन्ट देण्यात आलेला आहे.
डिजीटल क्रांतीची शक्ती ही महिलांच्या शक्तीला जोडणे हा उद्देश असल्याचे रिलायन्स फांउडेशनने म्हटले आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचे डिजीटल माध्यम सुरू केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-'वर्षातील ३६५ दिवस महिलांचा सन्मान केला पाहिजे'
काय आहे 'हर सर्कल'
- 'हर सर्कल'मध्ये भारतासह जगभरातील महिलांविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
- cहिलांच्या महत्त्वाकांक्षा, स्वप्ने यांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे.
- या डिजीटल माध्यमामध्ये महिलांशी निगडीत माहितीबरोबर रिलायन्सच्या तज्ज्ञांकडून आरोग्य, शिक्षण, आंत्रेप्रेन्युरशिप, वित्त, नेतृत्व याविषयी शिकविले जात आहे.
- तसेच नवीन कौशल्य शिकण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळे त्यांना नोकरीच्या योग्य संधी मिळू शकणार आहेत.
- हे केवळ महिलांसाठी समाज माध्यम आहे.