नवी दिल्ली- निस्सान मोटार इंडियाने सर्व वाहनांच्या किमती ५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. वाहनांच्या उत्पादनाचा खर्च वाढल्याने या किमती वाढविण्यात येणार आहेत.
निस्सान आणि डाटसनच्या सर्व मॉडेलच्या किमती जानेवारीपासून वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या बाजारपेठेत आव्हानात्मक स्थिती आहे. अशा स्थितीत निस्सान आणि डाटसनच्या किमती वाढविण्याचा निर्णय जाहीर घेतल्याचे कंपनीचे व्यस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले.