महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नववर्षात निस्सानच्या ५ टक्क्यांपर्यंत वाढणार किमती - Datsun vehicle price hike

निस्सान कंपनीच्या ठरावीक मॉडेलच्या किमती १ जानेवारी २०२१ पासून वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडून देशातील बाजारात निस्सान आणि डॅटसनसह विविध मॉडेलची विक्री करण्यात येते.

निस्सान
निस्सान

By

Published : Dec 23, 2020, 4:32 PM IST

नवी दिल्ली- जपानची कंपनी निस्सानने वाहनाच्या किमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या किमती पुढील महिन्यापासून ५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत.

निस्सान कंपनीच्या ठरावीक मॉडेलच्या किमती १ जानेवारी २०२१ पासून वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडून देशातील बाजारात निस्सान आणि डॅटसनसह विविध मॉडेलची विक्री करण्यात येते. या वाहनांच्या किमती २.८९ लाख रुपये ते १४.९५ लाख रुपये आहे.

हेही वाचा-वाढती कोविड-19 प्रकरणे पाहता कॅलिफोर्नियामध्ये अ‌ॅपल स्टोअर्स तात्पुरती बंद

निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले, की सध्या बाजारात आव्हानात्मक स्थिती आहे. उत्पादनाचा खर्च वाढल्याने वाहनाच्या किमती वाढविण्यात येणार आहेत. यापूर्वी मारुती सुझुकी इंडिया, रेनॉल्ड इंडिया, होंडा कार्स, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्ड इंडिया, इसुझू, बीएमडब्ल्यू इंडिया, ऑडी इंडिया आणि हिरो मोटोकॉर्पनेही वाहनाच्या किमती वाढविल्या आहेत.

हेही वाचा-'कोरोनानंतरच्या जगात भारताकरिता अगणित संधी उपलब्ध होणार'

वाहन उद्योग दोन वर्षापासून संकटात-

अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याने गतवर्षी वाहन उद्योगाला फटका बसला होता. तर चालू वर्षात कोरोनाच्या संकटाने वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details