मुंबई - केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी प्रशांत कुमार यांची येस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. सध्या, येस बँकेचे प्रशासक म्हणून प्रशांत कुमार कार्यरत आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे बुधवारी (१८ मार्च) तात्पुरते निर्बंध काढल्यानंतर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. या व्यतिरिक्त येस बँकेच्या संचालक मंडळाचे अकार्यकारी संचालक म्हणून महेश कृष्णमूर्ती आणि अतुल भेडा हे कार्यरत राहणार आहेत.