नवी दिल्ली- एफएमसीजीमधील मोठी कंपनी असलेल्या नेस्लेला दंड ठोठावून राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणाने चांगलाच दणका दिला आहे. नेस्लेने वस्तू व सेवा करातील कपातीचा लाभ ग्राहकापर्यंत पोहोचविला नाही. त्यामुळे राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणाने नेस्लेला ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नेस्ले कंपनीची मॅग्गी, किटकॅट अशी विविध उत्पादने बाजारात आहेत. केंद्रीय जीएसटी कायदा २०१७ मधील १७१(१) तरतुदीनुसार कंपन्यांना जीएसटी कपातीचा ग्राहकांना लाभ देणे बंधनकारक आहे. नेस्ले कंपनीने हा जीएसटीमधील कपातीचा लाभ ग्राहकांना दिला नसल्याचे नफेखोरी विरोधी प्राधिकरणाला आढळून आले.