महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नीरव मोदीच्या कंपनीची मालमत्ता गोठवा - एनसीएलएटीचे आदेश

एफडीआयपीएलची मालमत्ता गोठविण्याचे आदेश एनसीएलटी खंडपीठाच्या सदस्या सुचित्रा कानुपार्थि (सदस्य-न्यायिक) आणि व्ही. एस. नलासेनापती (सदस्य-तांत्रिक) यांनी दिले आहेत.

Nirav Modi
संग्रहित - नीरव मोदी

By

Published : Mar 4, 2020, 6:11 PM IST

मुंबई- सरकारी बँकांना चुना लावणाऱ्या नीरव मोदीची कंपनी फायरस्टार डायमंड इंटरनॅशनलची (एफडीआयपीएल) मालमत्ता गोठविली जाणार आहे. याबाबतचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने (मुंबई) दिले आहेत.

एफडीआयपीएलची मालमत्ता गोठविण्याचे आदेश एनसीएलटी खंडपीठाच्या सदस्या सुचित्रा कानुपार्थि (सदस्य-न्यायिक) आणि व्ही. एस. नलासेनापती (सदस्य-तांत्रिक) यांनी दिले आहेत.

हेही वाचा-पुरवणी मागण्यांनी राज्य सरकारच्या वित्तीय शिस्तीला 'ग्रहण'

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर सरकारी बँकांची १४,००० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मोदी आणि चोक्सी यांनी सर्वप्रथम पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याचे फेब्रुवारी २०१८ मध्ये उघडकीस आले होते. त्यानंतर इतर बँकांचीही मोदी आणि चोक्सी यांनी फसवणूक केल्याचे समोर आले होते.

हेही वाचा-सोन्याच्या दराला झळाळी; प्रति तोळा १,१५५ रुपयांनी महाग

मोदी-चोक्सी यांनी केलेल्या घोटाळ्याप्रकरणात पहिल्यांदाच कंपनीची मालमत्ता गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेहुल-चोक्सी हे सरकारी बँकांचे पैसे बुडवून विदेशात पळून गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details