महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटा-मिस्त्री प्रकरण : कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील एनसीएलएटीचा निकाल राखीव

एनसीएलएटीच्या दोन सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश एस. जे. मुखोपध्याय हे येत्या सोमवारी कंपनी निबंधकाच्या याचिकेवर निकाल देतील, अशी शक्यता आहे. एनसीएलएटीने १८ डिसेंबरला टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्तीचे आदेश दिले होते.

Tata Mistry case
टाटा-मिस्त्री प्रकरण

By

Published : Jan 3, 2020, 5:00 PM IST

नवी दिल्ली- सायरस मिस्त्री प्रकरणात काही बदल करण्याची याचिका कंपनी निबंधक कार्यालयाने राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (एनसीएलएटी) केली आहे. या याचिकेवरील निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय एनसीएलएटीने आज घेतला आहे.

एनसीएलएटीच्या दोन सदस्यीय खंडपीठाचे न्यायाधीश एस. जे. मुखोपध्याय हे येत्या सोमवारी कंपनी निबंधकाच्या याचिकेवर निकाल देतील, अशी शक्यता आहे. एनसीएलएटीने १८ डिसेंबरला टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्तीचे आदेश दिले होते. एनसीएलएटीने दिलेल्या निकालात कंपनी निबंधक कार्यालयाने बेकायदेशीपणे टाटा सन्स ही खासगी कंपनी केल्याचे म्हटले होते. तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचेही एनसीएलएटीने निकालात म्हटले होते.

संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण: टाटा सन्सचे सर्वोच्च न्यायालयात अपिल

टाटा सन्सचे सार्वजनिक ते खासगी कंपनीत रुपांतरित करताना कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. निकालातील बेकायदेशीर शब्द वगळावा, अशी कंपनी निबंधक कार्यालयाने एनसीएलएटीमध्ये याचिका दाखल केली आहे. सार्वजिक कंपनी खासगी करताना कोणती प्रक्रिया असते, याची एनसीएलएटीने कंपनी निबंधक कार्यालयाला गुरुवारी विचारणा केली आहे.

संबंधित बातमी वाचा-कंपनी व्यवहार मंत्रालयाची एनसीएलएटीमध्ये धाव; 'तो' शब्द वगळण्याची विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details