नवी दिल्ली- कोरोनाच्या लढ्यात आणखी एक औषध बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. औषध कंपनी नॅटको फार्मा कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी मोलनुपिरावीर या कॅप्सुलची कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सीडीएससीओकडे परवानगी मागितली आहे.
सीडीएससीओ ही औषधांचे उत्पादने, वैद्यकीय चाचण्या घेणे, औषधांचे मानाकंन, आयात करण्यात आलेल्या औषधांचे मानांकन याबाबत कार्यरत आहे. नाटको फार्मा कंपनीने सेंट्रल ड्र्ग्ज स्टँण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे (सीडीएससीओ) मोलनुपिरावीर कॅप्सल्युलच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. आपत्कालीन काळासाठी या औषधाला परवानगी मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. जर सीडीएससीओने परवानगी दिली तर कंपनी या महिन्यात औषध लाँच करेन, असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
चाचण्या यशस्वी-
कोरोनावर गुणकारी असे औषध तयार करण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. पण अजूनही कोरोनावर हमखास प्रभावी असलेले औषध सापडलेले नाही. इतर आजारावरील औषधाचा वापर उपचारासाठी केला जात आहे. अशावेळी आता झायडस कॅडीला कंपनीने कोरोनावर आपण तयार केलेले विराफीन औषध उपयोगी ठरत असल्याचा दावा केला आहे. देशभरात याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यातही या औषधाच्या 10 चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच डीसीजीआयने या औषधाच्या वापराला परवानगी दिल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले आहे. तर सर्व वयोगटातील रुग्णांसाठी हे औषध गुणकारी ठरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान या औषधामुळे रुग्ण केवळ 7 दिवसांत निगेटिव्ह होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-रुग्णालयाकडून कॅशलेस उपचार मिळत नसल्यास राज्य सरकारकडे तक्रार करा- आयआरडीएआय