महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का - Mukesh Ambani salary per year

कोरोना महामारीमुळे देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी वेतन घेतले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मुकेश अंबानी
मुकेश अंबानी

By

Published : Jun 3, 2021, 4:31 PM IST

नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून मागील वर्षात वेतन घेतले नाही. कोरोना महामारीमुळे विविध उद्योग व अर्थव्यवस्थेवर परिणाम न झाल्याने स्वेच्छेने अंबानी यांनी वेतन घेतले नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी मुकेश अंबानी यांचे वेतन निरंक (शून्य) आहे. तर आर्थिक वर्ष २०१९-२० साली अंबानी यांनी १५ कोटी रुपये वार्षिक वेतन घेतले होते.मुकेश अंबानी हे २००८-९ पासून वेतन, भत्ते, कमिशनसह वार्षिक एकूण १५ कोटी रुपयांहून एकूण वेतन रिलायन्स इंडस्ट्रीजकडून घेत आहेत.

हेही वाचा-रिलायन्स गुजरातमध्ये सुरू करणार १ हजार ऑक्सिजन बेडचे रुग्णालय

या कारणाने अंबानी यांनी घेतले नाही वेतन

कोरोना महामारीमुळे देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी वेतन घेतले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-सेबीचा अंबानी बंधूंना जोरदार दणका; 25 कोटींचा ठोठावला दंड

संचालक मंडळाला असे मिळाले वेतन

निखील आणि हितल मेसवानी यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये कायम राहिलेले आहे. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता या कंपनीच्या संचालकपदावर अकार्यकारी संचालक आहेत. त्यांना ८ लाख हे उपस्थित राहण्याचा भत्ता आणि इतर १.६५ कोटी रुपये भत्ते मिळाले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती ८४.५ अब्ज डॉलर्स आहे. फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या सहा महिन्यांत दर तासाला ९० कोटींची कमाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details