महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अँड्रॉईडसाठी बनवलेले मोबाइल अ‌ॅप्स आता विंडोज 10 मध्येही वेगात चालतील - latest technology news

सध्याच्या काळात, विंडोज 10 साठी बनविलेले अ‌ॅप 'योर फोन'च्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या संगणकावर अँड्रॉईड अॅप वापरू शकतात. मात्र, ते केवळ काही सॅमसंग फोनवरूनच वापरले जाऊ शकते. प्रोजेक्ट लाटेमुळे विकासक आता त्यांचे अ‌ॅप्स विंडोज 10 वर आणू शकतील जे याआधी उपलब्ध नव्हते.

विंडोज 10
विंडोज 10

By

Published : Dec 2, 2020, 7:59 PM IST

नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट 'लाटे' या प्रोजेक्टवर काम करीत आहे. यामध्ये अ‍ॅप डेव्हलपरला कोडमध्ये थोडासा बदल करून थेट त्यांचे अँड्रॉइड अ‍ॅप थेट विंडोज अ‍ॅपवर चालविण्यास अनुमती देण्यात देईल.

विंडोज सेंट्रलच्या अहवालानुसार, विकासकांना त्यांची अँड्रॉईड अ‍ॅप्स एमएसआयएक्स स्वरूपांनुसार पॅकेज करावे लागतील आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागतील.

हेही वाचा -अ‌ॅमेझॉनच्या भारतीय कर्मचाऱ्यांची दिवाळीनंतर 'दिवाळी'; ६,३०० रुपयापर्यंत मिळणार विशेष बोनस

एमएसआयएक्स एक विंडोज अ‍ॅप पॅकेज स्वरूप आहे, जे सर्व विंडोज अ‍ॅप्सना आधुनिक पॅकेजिंग अनुभव प्रदान करते.

सध्याच्या काळात, विंडोज 10 साठी बनविलेले अ‌ॅप 'योर फोन'च्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या संगणकावर अँड्रॉईड अॅप वापरू शकतात. मात्र, ते केवळ काही सॅमसंग फोनवरूनच वापरले जाऊ शकते.

प्रोजेक्ट लाटेमुळे विकासक आता त्यांचे अ‌ॅप्स विंडोज 10 वर आणू शकतील जे याआधी उपलब्ध नव्हते.

मात्र, प्रोजेक्ट लाटे प्ले सर्व्हिसला सपोर्ट देणार नाहीत. कारण, गुगल नेटिव अँड्रॉईड अ‍ॅप्स आणि क्रोम ओएसएस वगळता या सेवेस इतर कुठेही स्थापित करण्याची परवानगी देत ​​नाही.

हेही वाचा -गुगलचा जिओमध्ये ७.७३ टक्के हिस्सा; रिलायन्सला मिळाले ३३,७३७ कोटी रुपये!

ABOUT THE AUTHOR

...view details