नवी दिल्ली - डिजीटल वॉलेट आणि देयक व्यवहार कंपनी मोबिक्वीकने वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काही सायबर सुरक्षा संशोधकांनी मोबिक्वीकचा डाटा डार्कवेबवर उपलब्ध असल्याचा दावा केला होता.
मोबिक्वीक चालू वर्षात आयपीओ आणून २०० ते २५० दशलक्ष डॉलर संकलित करणार आहे. मात्र, त्यापूर्वी कंपनी ही वापरकर्त्यांचा डाटा लीक झाल्याच्या संशयामुळे चर्चेत आली आहे. सायर सुरक्षा संशोधकांनी मोबिक्वीकमधील ३.५ दशलक्ष लोकांचा केवायसीचा डाटा डार्क वेबवर उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. याबाबत पहिले ट्वीट सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरियांनी केले होते. त्यानंतर फ्रान्सच्या सायबर सुरक्षा संशोधक एलियट एल्डरसनने ८.२ टीबी डाटा हा लीक झाल्याचे म्हटले आहे. या डाटामध्ये वापरकर्त्यांचे फोन क्रमांक, ईमेल, हॅश पासवर्ड, पत्ता, बँकांचे अकाउंट क्रमांक आणि कार्डची माहिती यांचा समावेश आहे.
हेही वाचा-देशात कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण; शेअर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता